न.पं. स्थापनेसाठी ओरोसमध्ये खास ग्रामसभा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 22, 2025 12:23 PM
views 651  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेसाठी ओरोस ,रांनबांबूळी आणि अणाव ग्रामपंचायतीने ठराव घेण्याकरिता खास ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढताच ओरोस ग्रामपचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खास ग्रामसेभेचे आयोजन केले आहे.

जिल्ह्याच्या मुख्यालयाची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरी मध्ये ओरोस, रानबांबूळी आणि अणाव या तीन गावांचा समावेश आहे वाढती नागरी वस्ती व अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन तिन्ही गावांचा समावेश असलेल्या सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेचा प्रस्ताव 2016 मध्ये शासनाला सादर केला. त्याची प्रारूप प्रसिद्धीही झाली होती. अगदी मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेसाठी होती. मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी ती अडकली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नागरिकाकडून सांतत्याने नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी सुरु होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फेर प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

जिल्हाधिकऱ्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकारणच्या झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणसह ओरोस, रानबांबूळी आणि अणाव तिन्ही गावाचा समावेश करून नगरपंचायत स्थापन करण्यासाठी शासनाला फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी तिन्ही गावांनी ग्रामसभा घेऊन नगरपंचायत स्थापने बाबत ठराव घेण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे तिन्ही ग्रामपंचायतीना कळविण्यात आले आहे. त्यानंतर ओरोस ग्रामपंचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता खास ग्रामसेभेचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच आशा मुरमुरे यांनी केले आहे.