शिक्षणमंत्र्यांचं पत्रकार संघाच्यावतीने खास अभिनंदन..!

Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2024 06:46 AM
views 158  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीतच हा ऐतिहासिक निर्णय झाला तसेच आजच पत्रकार महामंडळाला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केल्यामुळे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने दीपक केसरकर यांचे त्यांच्या कार्यालयात हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक गजानन नाईक, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे, राजू तावडे, माजी अध्यक्ष विजय देसाई,  सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार भरत केसरकर, विकास गावकर, सचिन रेडकर, प्रा. रुपेश पाटील, रुपेश हिराप, आनंद धोंड, शैलेश मयेकर, प्रसन्न गोंदावळे, सिद्धेश सावंत, साबाजी परब, भुवन नाईक यांच्या उपस्थितीत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. दरम्यान यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने वेळोवेळी राबविण्यात आलेल्या विधायक  उपक्रमांचे शिक्षण मंत्री यांनी कौतुक करून आपण सर्वतोपरी पत्रकार बांधवांच्या मदतीसाठी नेहमीच तयार आहोत, असे सांगत वेळोवेळी नक्की हवी ती मदत केली जाईल, असे आश्वासित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मानले.