
कणकवली : न. पं. चा कारभार स्वीकारल्यानंतर फारच कमी वेळात गणेश चतुर्थीच्या एकंदरीतच नियोजनात मुख्याधिकारी गौरी पाटील यानी दिलेले योगदान व त्यामुळे गणेश भक्त, चाकरमानी, नागरिक, व्यापारी इत्यादी साऱ्याच वर्गवारीतील जनतेने यंदाचा गणेश चतुर्थी उत्सव फारच चांगल्या व आनंदात अनुभवला. व्यापारी संघाने गणेश चतुर्थी पूर्वीच्या नियोजन सभेत केलेल्या सूचना विनंती यांचा आदर केला गेला, व गणेश भक्ताना आनंददायक गणेश चतुर्थी साजरी करता आली. यानिमित्ताने कणकवली व्यापारी संघाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांची आज भेट घेऊन अभिनंदन केले. व्यापारी संघाच्या सर्वच सामाजिक उपक्रमाना असेच सहकार्य करावे अशी विनंती केली. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा प्रतिसाद सकारात्मक होता.