सोनुर्लीची लोटांगणाची आज जत्रा !

Edited by: ब्युरो
Published on: November 28, 2023 10:55 AM
views 168  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज 28 नोव्हेंबरला होतेय. पहाटेपासून इथ देवीच्या दर्शनाला रांग लागते.  नवसाला पावणाऱ्या व दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव हा लोटांगणासाठी सिंधुदुर्गसह कोकणात प्रसिद्ध आहे.

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीच्या चरणी जत्रोत्सवानिमित्त अनेक भक्त लीन होतात. त्यामुळे या देवी माऊलीची महती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. रात्री लोटांगण घालत भक्तगण नवस फेडणार आहेत. जत्रोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी जत्रोत्सवाच्या योग्य नियोजनासाठी देवस्थान कमिटी, पोलीस प्रशासन, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग सज्ज झाल आहे. सोमवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी देवीच दर्शन घेतल. दीपक केसरकर यांनी ग्रामस्थांकडून जत्रोत्सवाचा आढावा घेत विचारपूस केली.