एकमेव फायद्यात चालणारी योजना : सागर साळुंखे

Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 09:13 AM
views 88  views

सावंतवाडी : ५१ व राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यांसह माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आपलं मत व्यक्त केले. शहराची पाणीपुरवठा योजना ही जुनी आहे‌.

केसरी येथील नळपाणी योजना ऐतिहासिक असून ती गुरूत्वाकर्षणावर आधारीत आहे. सावंतवाडीची पाणीपुरवठा योजना ही एकमेव फायद्यात चालणारी योजना आहे‌. वाढत शहरीकरण विचार करता ५६ कोटींची नवी नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आज होत आहे असं मत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी व्यक्त केले.