गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमीत्त मळगावमध्ये सोलर स्ट्रीट लाईट

Edited by: विनायक गावस
Published on: November 03, 2023 16:27 PM
views 109  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाॅटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसा निमीत्त मळगावमध्ये सोलर स्ट्रीट लाईट लोकापर्ण करण्यात आल. सुधिर राऊळ आणि राकेश परब यांचा पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. सोलर स्ट्रीट लाईटच उद्घाटन मनसे जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि राजू राऊळ, गौरेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मळगाव ब्राम्हणआळी मध्ये सोलर लाईट देण्यात आली. कार्यक्रमासाठी लाॅटरीसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या. या सोलर लाईट मुळे तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. ही घर जंगल पट्टयात असल्याकारणाने तेथून जाणारी जुनी पायवाट आणि बाजूला असणारी गणेश तळी आणि पाणी पिण्याची विहीर यासाठी तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सोलर लाईटचा उपयोग होणार आहे.

ही सोलर लाईट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी गणेश कदम आणि तेथील मनसैनिकांचे आभार मानले. यावेळी महाराष्ट्र सैनिक साहिल तळकटकर, ओमकार नवार, संदीप राऊळ, जय राऊळ, अर्जुन गावकर मकरंद राऊळ गजेंद्र राऊळ अनिल राऊळ अनिता राऊळ गजानन राऊळ सुहासिनी राऊळ राखी राऊळ आदी उपस्थित होते.