तिरोडा कोल्हारवाडीत मनसेकडून सोलर लाईट..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 26, 2023 13:13 PM
views 211  views

सावंतावडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा कोल्हारवाडी सावंतवाडा येथे गणपती विसर्जन स्थळी मनसेच्या वतीने सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले. येथील स्थानिकांच्या मागणीनुसार मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या माध्यमातून सोलर लाईट देण्यात आली. यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्यावतीने पाठपुरावा करण्यात आला होता. 

सोलर लाईटचे श्री नारायण सावंत व मनसे विद्यार्थी सेनेचे सावंतवाडी तालुका सचिव मनोज कांबळी यांच्या हस्ते नारळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रशांत सावंत चंद्रकांत सावंत रामचंद्र कांबळी संदेश शेट्ये अमर सावंत ध्रुवबाळ सावंत मयूर पालकर ओमकेश गोडकर प्रणित तळकर भैय्या कोल्हे आदी उपस्थित होते.  सोलर लाईटची मागणी मनसेच्या वतीने पूर्ण करण्यात आल्याने उपस्थितांनी श्री कदम व श्री सुभेदार यांचे आभार मानण्यात आले.