
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात एसटी महामंडळाचे आगार होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डी. के. सुतार यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे.उद्या प्रजासत्ताक दिनी वैभववाडी बसस्थानकासमोर ते उपोषण करणार आहेत.
वैभववाडी तालुक्याचा बहुतांश भाग ग्रामीण आहे.आजही दळणवळणासाठी एसटी हाच पर्याय आहे.यासाठी कणकवली आगाराच्या गाड्या ह्या येथील प्रवाशांना आधार आहेत.मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये एसटीच्या फे-या कमी प्रमाणात होतात.त्याचा परिणाम प्रवासी वाहतूकीवर होतो. त्याकरिता तालुक्यासाठी स्वतंत्र आगार मंजूर व्हावा अशी मागणी सुतार यांनी केली आहे.याकरिता त्यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण निश्चित केले आहे.या उपोषणाला तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांनी पाठींबा दर्शविला आहे.