
दोडामार्ग : दोडामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने, पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जुलै २७ रोजी वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून, साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी 26 रोजी वृक्ष वाटप, प्राथमिक शाळा च्या विद्यार्थी ना खाऊ वाटप,रविवारी ,मांगेली पर्यटन स्थळ येथे स्वच्छता मोहिम, सोमवारी नागनाथ मंदिर येथे लघुरूद करणे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात आज दोडामार्ग तालुक्यातील कार्यकारणी बैठक येथील तालुका संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, तालुका प्रमुख संजय गवस, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उपजिल्हा संघटक विजय जाधव, महिला उपजिल्हा संघटक, विनिता घाडी, तालुका महिला संघटक श्रेया ली गवस, उप तालुका प्रमुख, मिलिंद नाईक, उप तालुका संघटक संदेश वरक, भिवा गवस, संदेश राणे, गणेश धुरी, दशरथ मोरजकर,जेनिफर लोबो,सिध्दू कासार, प्रदिप सावंत, नयनी शेटकर,दिलीप शेलैकर,चंद्रकांत नाईक, दयानंद गवस, प्रमोद ठोंबरे, शुभंकर देसाई, प्रकाश कदम,बम्हानाथ गवस रेश्मा शेख आदी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.