दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम

Edited by:
Published on: October 23, 2025 14:42 PM
views 38  views

सिंधुदुर्ग : “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना अंतःकरणात जपणारे कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवस हा केवळ केक, गिफ्ट किंवा साजरेपणापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या गरजा ओळखून सेवेचे व्रत घेत साजरा करण्यात आला.


या निमित्ताने ६७ युवकांनी रक्तदान केले. शेकडो रस्त्यावरील मुलांना अन्नदान, ७५ दृष्टिहीन बांधवांना सफेद काठी वाटप असे समजपयोगी उपक्रम घेण्यात आले. याशिवाय पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट, दोन शाळांना व्हाईट बोर्ड, २१ महिलांना मोफत शिलाई मशीन देण्यात आलीत.

 स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यासाठी असे उपक्रम घेण्यात आलेत. या उपक्रमात कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत, प्रकल्प समन्वयक हनुमंत गवस, प्रकल्प व्यवस्थापक अमित पाटील, लेखापाल अवंती गवस, तसेच अमोल गुराम आदी मान्यवर उपस्थित होते.


दयानंद कुबल यांनी १५ वर्षांहून अधिक काळात सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत असून ग्रामीण विकास, अनाथ मुलांची काळजी, शिक्षण, आरोग्य, आदिवासी विकास, स्वच्छता आदी क्षेत्रांत त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.“दया ही केवळ नावात नसून कृतीतून ते समाजाला आनंद देण्याचे कार्य करतात,” असे उपस्थित मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.