
चिपळूण : राष्ट्रीय अंधकल्याण असोसिएशन चिपळूण जिल्हा रत्नागिरी तर्फे शैक्षणिक पुर्नवसनांतर्गत शिल्पा जाधव दृष्टीबाधित रा.सरंद, ता संगमेश्रर यांना शैक्षणिक मदतीचा धनादेश देण्यात आला. ही आर्थिक शैक्षणिक मदत नॅब चिपळूणचे अध्यक्ष- सुचय अण्णा रेडीज, कार्यवाह निलेश भुरण, संचालक प्रकाश पाथरे, अंबरीश खातु, भरत नांदगांवकर विकास अधिकारी संदीप नलावडे आदींच्या उपस्थितीत देण्यात आला.