कौस्तुभ नाईक यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यालयात कपडे, धान्य, खाऊ वाटप
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 17, 2022 16:55 PM
views 235  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी शहर सचिव कौस्तुभ नाईक यांचा वाढदिवस आरोस - कोंडुरा येथील श्री माऊली मूकबधिर विद्या मंदिरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

 यावेळी मूकबधिर विद्या मंदिरातील मुलांना नाईक यांच्याकडून कपडे तसेच धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब,  दर्शन सावंत, हेमंत नाईक, ओमकार सावंत तसेच   पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.