पाटेकर बालगोपाल मंडळाचा सामाजिक उपक्रम !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 16, 2024 12:49 PM
views 210  views

कुडाळ : साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे.  त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   या मंडळातील चैतन्य हळदणकर, स्वप्नील सामंत, सर्वेश हळदणकर, तुकाराम हळदणकर,  कुणाल पारकर, अजिंक्य हळदणकर,  शंकर नागडे,  प्रथमेश डिचोलकर, सोहम हळदणकर, साहिल हळदणकर, शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

  वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून सुखानंद हळदणकर, निलेश सावंत, शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले.