
वेंगुर्ले : रोटरी वर्ष २०२४-२५ या नवीन रोटरी वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाउन चा कार्यभार नव्याने स्वीकारलेल्या अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी ऍड प्रथमेश नाईक आणि संपूर्ण क्लब मेंबर्सनी आज कृषिदिन व डॉक्टर दिनाचे औचित्य साधून १० प्रगतशील शेतकऱ्यांना नारळाची झाडे वाटप केली. तसेच त्यासोबत आवश्यक खताचा पुरवठा केला. उपस्थित शेतकऱ्यांनी त्याबाबत रोटरी क्लब चे आभार मानले.
तसेच आज डॉक्टर डे निमित्त रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला चे मिडटाऊन चे सदस्य डॉ राजेश्वर उबाळे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे जाऊन त्यांच्या अविरत रुग्ण सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. यावेळी डॉ उबाळे यांनी नवीन रोटरी वर्षानिमित्त नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत रोटरी मार्फत अविरत लोकसेवेचे व्रत सुरु ठेवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन चे नूतन अध्यक्ष योगेश नाईक, सेक्रेटरी ऍड प्रथमेश नाईक, माजी अध्यक्ष राजू वजराटकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, सुनील रेडकर, धनेश आंदुर्लेकर, वसंतराव पाटोळे, उदय दाभोलकर आदि रोटरियन उपस्थित होते.