
सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम सावंतवाडीत राबविण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष राकेश नेवगी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला वॉटर प्युरिफायर भेट स्वरूपात दिला. याचा फायदा रूग्णांना होणार असल्यानं वैद्यकीय अधिक्षकांकडून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे योगदान देणाऱे सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, बाबल्या दुभाषी, रोहन परब, इफ्तेकार राजगुरू, संतोष जोईल, याकुब शेख, बावतीस फर्नांडिस, अफरोज राजगुरू, चित्रा देसाई, रिद्धी परब, पुनम वंजारी, अँड.सायली दुभाषी, मंजिरी परब, सुनील उपरकर, मारीता फर्नांडिस आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.