कुडाळातील 5 ग्रा.पं.च्या निवडणुकीत एवढे उमेदवार रिंगणात !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 26, 2023 11:37 AM
views 220  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आज बुधवारी सरपंच पदाच्या १५ उमेदवारांनी तर सदस्य पदाच्या १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. कुडाळ तहसील कार्यालय येथे हे अर्ज मागे घेण्यात आले.

हुमरमळा (अणाव) या ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारणसाठी असून सरपंच पदासाठी ५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १ मध्ये ३ जागा असून सर्वसाधारण महिला २ जागा ५ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा ४ रिंगणात, प्रभाग २ मध्ये २ जागा नामाप्र महिला १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात, प्रभाग ३ दोन जागा सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा ६ रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदेश परब काम पाहत आहेत.

तसेच हुमरमळा (वालावल) ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद सर्वसाधारणसाठी असून २ रिंगणात  आहेत. प्रभाग १ मध्ये २ जागा सर्वसाधारण महिला २ जागा ४ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात, प्रभाग २ मध्ये २ जागा नामाप्र १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात, प्रभाग ३ मध्ये २ जागा सर्वसाधारण महिला १ जागा या ठिकाणी रश्मी रमाकांत वालावलकर यांचा १ अर्ज प्राप्त झाला आहे. सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळकृष्ण परब काम पाहत आहेत.

वालावल ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद सर्वसाधारणसाठी असून रिंगणात आहेत. प्रभाग १ मध्ये ३ जागा नामाप्र महिला १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात, प्रभाग २ मध्ये ३ जागा सर्वसाधारण महिला ३ जागा २ रिंगणात, प्रभाग ३ मध्ये ३ जागा अनुसूचित जाती जमाती १ जागा, या ठिकाणी अनंत हरिश्चंद्र वालावलकर यांचा १ अर्ज दाखल झाला आहे. नामाप्र १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात आहेत.  या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रफुल्ल वालावलकर काम पाहत आहेत.

भडगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पद सर्वसाधारण साठी असून ३ रिंगणात  आहेत. प्रभाग १ मध्ये २ जागा सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा ३ रिंगणात, प्रभाग २ मध्ये ३ जागा नामाप्र १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण महिला २ जागा २ रिंगणात, प्रभाग ३ मध्ये २ जागा सर्वसाधारण महिला १ जागा ३ रिंगणात, सर्वसाधारण १ जागा ३ रिंगणात आहेत.  या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. जंगले काम पाहत आहेत.

वर्दे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सर्वसाधारण असून ५ रिंगणात आहेत. प्रभाग १ मध्ये ३ जागा अनुसूचित जाती १ जागा यासाठी मनोज वासुदेव जाधव यांचा एक अर्ज प्राप्त झाला आहे. सर्वसाधारण महिला २ जागा ४ रिंगणात, प्रभाग २ मध्ये २ जागा सर्वसाधारण १ जागा २ रिंगणात, सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात, प्रभाग ३ मध्ये २ जागा सर्वसाधारण १ जागा ३ रिंगणात, सर्वसाधारण महिला १ जागा २ रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खरात काम पाहत आहेत.


५ ग्रामपंचायतीच्या होणार पोटनिवडणुका

कुडाळ तालुक्यामध्ये ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका होणार असून सोनवडे तर्फ हवेलीमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण जागेसाठी १ रिंगणात, तेंडोली नामाप्र महिला १ जागेसाठी २ रिंगणात, गावराईमध्ये सर्वसाधारण महिला १ जागेसाठी १ रिंगणात आहेत. रानबांबुळी मध्ये अनुसूचित जमाती १ जागा व निवजेमध्ये नामाप्र १ जागा एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.