
सिंधुदुर्गनगरी : पुन्हा पुन्हा सूचना देऊनही कर्मचाऱ्यांचे उशिराने येणे थांबलेले नाही. आज अजून ५९ जण उशिराने आल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र हे थांबले नाही तर उशिराने कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसांचे पगार कापले जातील, असं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलं.