
वैभववाडी : महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघ सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी यांच्यावतीने मंगळवार (ता. १७)डिसेंबर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह वैभववाडी येथे सकाळी १०वा.पोलीस पाटील दिन साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने तालुक्यातील पोलिस पाटील बांधवांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला तहसीलदार सुर्यकांत पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल उपस्थित राहणार आहेत.यावेळी सर्व पोलिस पाटील यांचा सत्कार होणार आहे. तालुक्यातील सर्व आजी, माजी पोलिस पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे सचिव सुनिल कांबळे यांनी केले आहे.