सावंतवाडीत २३ फेब्रुवारीला गाडगेबाबा जयंती

Edited by:
Published on: February 17, 2025 13:40 PM
views 187  views

सावंतवाडी : श्री संत गाडगेबाबा महाराज परीट समाज सेवा संघ सावंतवाडी तालुक्याच्यावतीने २३ फेब्रुवारीला रविवार रोजी कळसुळकर हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे मच्छी मार्केट नजीक  सिंधुदुर्ग जिल्ह्याची तिसरी संत गाडगेबाबा जयंती व तिसरा स्नेह मेळावा आयोजित केला आहे. 

परीट समाजाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संत गाडगेबाबा जयंती व स्नेह मेळाव्याला परीट समाजाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे श्री संत गाडगेबाबा जयंती  मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यावेळी सकाळी 8.30 वाजता मच्छी मार्केट, भाजी मंडई व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे, सकाळी 10 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व नामस्मरण, सकाळी 10.30 वाजता स्वागत समारंभ, दीप प्रज्वलन, सत्कार, मान्यवरांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण, दुपारी 12.00 वाजता संत गाडगेबाबा महाराजांच्या जीवनावर आधारित कीर्तन, दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, दुपारी 4 वाजता सुश्राव्य भजन व सायं. 5 वाजता आभार प्रदर्शन व समारोप असे कार्यक्रम कळसुळकर कॉलेज व जुनिअर कॉलेज सावंतवाडी येथे संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संघ सावंतवाडी तालुका यांच्यावतीने आयोजित केले आहेत.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील परीट समाजातील सर्व बंधू भगिनींनी, सावंतवाडीतील नागरिकांनी व गाडगेबाबांच्या भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री संत गाडगेबाबा महाराज परीट सेवा संघ सावंतवाडी तालुक्याचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भालेकर, तालुका सरचिटणीस लक्ष्मण बांदेकर, तालुका खजिनदार जितेंद्र मोरजकर यांनी केले आहे.