
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्य माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ इयत्ता दहावी प्रथम क्रमांक कु. निधी प्रकाश सावंत,सेंट उर्सुला स्कूल, वरवडे, कु. सौजन्या संजय घाटकर ,नाथ पै. विद्यालय कुडाळ ,द्वितीय क्रमांक कु. पुनम दिनेश दळवी पणदुर हायस्कूल पणदुर, कु.अर्पिता अमेय सामंत, अण्णासाहेब देसाई विद्यालय परूळे,कु. कैवल्य सागर मिसाळ, टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय क्रमांक कु.गायत्री विजयकुमार राठोड न्यू. इंग्लिश स्कूल फोंडाघाट,उच्च माध्यमिक शालांत परीक्षा २०२४,इयत्ता बारावी प्रथम क्रमांक कु. तन्वी केदार म्हाडगुत,डॉन बास्को हायस्कूल व ज्यु.कॉलेज ओरोस, द्वितीय क्रमांक कु. आराध्य मंदार भिसे, डॉन बॉस्को हायस्कूल व ज्यु. कॉलेज ओरोस तृतीय क्रमांक कु.परेश सतीश मडव, कणकवली कॉलेज कणकवली,तृतीय क्रमांक कु.स्नेहलता सत्यविजय तेली, टोपीवाला जु.कॉलेज मालवण. तसेच जिल्हा बँक अधिकारी कर्मचारी यांच्या परीक्षेतील गुणवंत पाल्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कु.वैभवी सुनील धुरी, कु.साहिल अतुल पडेलकर कु.मनीषा संदीप सामंत,कु. सोनल सतीश अटक ,तसेच माननीय संचालक महोदय यांचे पाल्य कु.सोहम प्रकाश बोडस, कु.गायत्री प्रकाश बोडस या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अल्पबचत प्रतिनिधी रवींद्र आदम ,विष्णू जोशी आणि अभिजित वंजारे यांचा सत्कार ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रस्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले.