पाईपलाईनसाठी मारलेले चर अपघातास कारणीभूत

देव्या सुर्याजींनी वेधलं मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: November 21, 2023 19:30 PM
views 154  views

सावंतवाडी : शहरात पाईपलाईनसाठी मारलेले चर बुजवण्याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच लक्ष वेधलं आहे.

शहरात पाणी पुरवठा विभागाने घरगुती कनेक्शनसाठी मारलेले चर गेली तीन वर्षे तसेच आहेत. माठेवाडा, जुनाबाजारसह शहरात पाईपलाईनसाठी मारलेले हे चर अपघातास कारणीभूत ठरत आहेत. यामुळे अपघाता सारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. मा. मुख्याधिकारी महोदय आपण संबंधित विषयात लक्ष घालून हे चर तात्काळ बुजविण्यात यावेत अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे.