
चिपळूण: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या आय.टी. आय.सावर्डेमध्ये अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कौशल्य दीक्षांत समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात स्व .गोविंदराव निकम साहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून दिपप्रज्वलनाने झाली. ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर चंद्रकांत भाऊराव सुर्वे चेअरमन, व्यवस्थापक कमिटी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावर्डे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रविण वाघचौरे, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सचे प्राचार्य माणिक यादव आणि प्रमुख मार्गदर्शक मंगेश भोसले प्राचार्य, सह्याद्री तंत्रनिकेतन सावर्डे हे लाभले. आय.टी.आयचे प्राचार्य उमेश लकेश्री यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सह्याद्री आय.टी.आय.चे प्राचार्य उमेश लकेश्री यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणामध्ये,आता नवीन प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आवाहन केले, की तुम्ही सुद्धा पुढील परीक्षेत अव्वल मार्कानी पास होऊन तुमचा सुद्धा गौरव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
त्यानंतर सह्याद्री आय.टी.आय.चे विविध ट्रेड मधून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह गुलाब पुष्प व उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.
त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक मंगेश भोसले प्राचार्य, सह्याद्री तंत्रनिकेतन सावर्डे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव केला व आय.टी.आय.च्या प्रशिक्षणार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले, त्यांचे श्रेय प्रथम सह्याद्री शिक्षण संस्था, आय.टी.आय. कॉलेज व तेथील प्राचार्य व शिक्षकांचे आहे. असे म्हटले त्याचबरोबर माननीय पंतप्रधान मोदीजी यांना अभिप्रेत असलेला "आत्मनिर्भर भारत "हा फक्त आय.टी.आयचे प्रशिक्षणार्थीच भारताला आत्मनिर्भर बनवू शकतात, कारण त्यांच्या हातामध्ये कौशल्य आहे. आणि हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. कारण आय.टी.आय मध्ये प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळी रोजगार विषयक कौशल्य ही प्रात्यक्षिकाद्वारे शिकवली जातात.आज जर्मनी सर्व देशांमध्ये नंबर एक आहे.कारण तेथील 50 % विद्यार्थी हे आय.टी.आयचे प्रशिक्षण घेतात, म्हणून जर्मनी सर्व उद्योगधंद्यामध्ये आघाडीवर असणारा देश आहे.
त्याचबरोबर त्यांनी उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्याकडे soft skill असली पाहिजेत, त्यासाठी त्यांनी आपल्या देशातील महान उद्योजक श्री.किर्लोस्कर यांचे उदाहरण दिले . त्यांच्या Team work Skill मुळे त्यांचे उत्पादन,किर्लोस्कर पंप हे आज 150 देशांमध्ये विकले जाते.त्याचबरोबर वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे, याची त्यांनी सखोल अशी माहिती प्रशिक्षणार्थ्यांना दिली.
तसेच कार्यक्रमादरम्यान ठिक 11.00 वाजता देशपातळीवर विज्ञान भवन नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत कौशल्य दीक्षांत समारंभ साजरा करण्यात आला त्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशांमधील आय.टी.आय.तील अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्वांना दाखवण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व निदेशक वर्ग व सर्व आजी-माजी विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष महादेव गोरिवले यांनी केले.










