
दोडामार्ग : आजचे युग हे संगणकाचे आणि कौशल्य विकासाचे आहे. ज्याच्याकडे ते ज्ञान आणि कला आहे तोच जगू शकतो. स्पर्धेत टिकू शकतो.त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज आहे. ज्याच्याकडे असे शिक्षण आणि कला आहे तोच व्यक्ती जगू शकतो असे प्रतिपादन वेदांता ग्रुप कंपनीचे स्थानिक विभाग प्रमुख बाबाची पागीरे यांनी केले.
येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात वेदांता कंपनीच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थी व तालुक्यातील विविध घटकांसाठी संगणक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मराठी इंग्रजी टायपिंग, अडव्हान्स एक्सेल, टॅली, बेसिक कोर्स,इत्यादिचे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यन्त असे कोर्स पूर्ण केलेल्या 50 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दोडामार्ग नगर पंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, वेदांता सेसा कंपनीचे निलेश झोरे, दिनेश दवंडे,कु वैभवी कुलकर्णी,कु कीर्तना बियारा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सावंत उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले की वेदांता कंपनीचे कार्य वाखानन्या योग्य असून त्यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी, नोकरीं वं घरकाम करनाऱ्या महिला बरोबरच इतर सर्वच घटकांसाठी संगणक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष सावंत म्हणाले की दोडामार्ग तालुका दुर्गम, डोंगराळ आणि विकसित विभागापासून दूर आहे. आपल्याकडे शिक्षण प्रशिक्षणाची साधनं कमी आहेत.
त्यामुळे कंपनीने चालू केलेल्या या कोर्सचा लाभ सर्वांनी करून घेतला पाहिजे. फक्त शंभर रुपयांमध्ये हे प्रशिक्षण आपल्याला मिळते. बाजारामध्ये याची फी प्रचंड आहे. ती आपणाला परवडत नाही.म्हणून या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे . यावेळी वेदांता कंपनीचे निलेश झोरे,दिनेश दवंडे, वैभवी कुलकर्णी,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन या कोर्सच्या संचलिका सेफाली गवस यांनी केले.तर उपस्थित यांचे आभार डॉ. संजय खडपकर यांनी मांनले. यावेळी विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.