अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन सिंधुदुर्गच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

कानु शेळके अध्यक्षपदी
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 19, 2026 16:36 PM
views 423  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाच्या वतीने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज भवन, सिंधुदुर्ग' या नियोजित संस्थेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. समाजाच्या वतीने ही निवड प्रक्रिया पूर्णपणे एकमताने पार पडली असून, जिल्हाभरातील विविध मान्यवरांना यामध्ये जबाबदारी देण्यात आली आहे. समाजाच्या हितासाठी आणि नियोजित समाज भवनाच्या उभारणीसाठी ही कार्यकारिणी कटिबद्ध राहणार आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

कार्यकारिणी पदाधिकारी अध्यक्ष कानु शेळके कुडाळ, उपाध्यक्ष राजेश वरक कुडाळ, सचिव संतोष बोडके वैभववाडी, खजिनदार बापू खरात कणकवली, नवल गावडे - दोडामार्ग, गंगाराम कोकरे - देवगड, पांडुरंग काळे - वैभववाडी, रामचंद्र जंगले - कणकवली, विलास जंगले - सावंतवाडी, विजय खरात - मालवण, गुंडू शेळके - वेंगुर्ले, रुपेश लांबर - वेंगुर्ले, लखु खरवते - दोडामार्ग, प्रकाश कोकरे - देवगड, अमोल जंगले - मालवण, लक्ष्मण शेळके - वैभववाडी, दिव्यानी खरात - कुडाळ, मनीषा खरात - वेंगुर्ले, सीताराम लांबर सावंतवाडी,

जिल्ह्यातील धनगर समाजाच्या एकजुटीसाठी आणि नियोजित समाज भवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही कार्यकारिणी आगामी काळात कार्य करणार आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.