
सिंधुदुर्गनगरी : सभेदरम्यान प्राथमिक शिक्षण विभागातील एका महिला अधिकाऱ्याने ‘औरंगाबाद’ असा उल्लेख केल्याने सदस्य आक्रमक झाले. सभागृहात या बाबतच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या सदस्य रामा उर्फ दीपक गवस यांनी हा विषय सांभागृहा समोर आणला या नंतर सर्वच सदस्यांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्याकडून माफीची मागणी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा योग्य उल्लेख करत सभागृहाची माफी मागितली.










