
सिंधुदुर्ग : ऑगस्ट महिना अर्धा उलटून गेला असून नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सारखा सण पण होवून गेला, तरी माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार अद्यापही झालेले नाहीत. श्रावण महिन्यातील ऐन सणासुदीच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार न झाल्यामुळे त्यांचे हे महत्त्वाचे सण अंधारात जात आहेत. तसेच कर्मचाऱ्यांचे कर्जाचे हप्ते विलंबाने जाणार आहेत. त्याला सर्वस्वी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी जबाबदार असल्याचा आरोप शिक्षक परिषदेच्यावतीने करण्यात आला.
कार्यालयीन वेळ संपल्यानंतर काही कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यते संदर्भातील फाईल घरी घेऊन जाण्याचे प्रकार सध्या सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. या फाईल ऑफीसच्या बाहेर नेणाऱ्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती भरत केसरकर, नंदन घोगळे, सलिम तकीलदार यांनी दिली.