भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचा सत्कार

परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० रुग्णांची केली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 10, 2022 16:46 PM
views 155  views

सावंतवाडी : भाजपा वैद्यकीय आघाडीच्या पाठपुराव्यामुळे व सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे व तुळस पंचक्रोशीतील ६० वृद्ध रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय , ओरस येथे केल्याबद्दल भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

    सप्टेंबर महिन्यात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने वेंगुर्ले तालुक्यातील परुळे ग्रामपंचायत व तुळस आरोग्य केंद्रात भाजपाच्या सहकार्याने मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही शिबिराचा जवळ जवळ २६० ग्रामस्थांनी सहभाग घेऊन डोळ्यांची तपासणी करून घेतली होती . त्या शिबिरातील ज्या रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते , अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ओरस येथे जिल्हा रुग्णालयात आॅक्टोंबर मध्ये करण्यात आली . यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील ६० लोकांची मोफत शस्त्रक्रिया शासनाच्या योजनेतून यशस्वी केली . त्यामुळे गोरगरीब जनतेला त्याचा फायदा झाला.जे रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करु शकत नव्हते , त्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांचा भाजपा च्या वतीने सत्कार करण्यात आला.

     यावेळी वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई यांच्या सोबत भाजपा जिल्हा चिटणीस व माजी सभापती निलेश सामंत , जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , वेंगुर्ले भाजपचे ता.उपाध्यक्ष व कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत , तुळस शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर , युवा मोर्चा ता.सरचिटनीस नारायण कुंभार इत्यादी उपस्थित होते .