
सिंधुदुर्ग : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील सुरक्षा रक्षक मारहाणीचा सिंधुदुर्गातील सुरक्षा रक्षकांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिंधुदुर्ग सुरक्षा रक्षक प्रतिनिधी विजय गुरव यांनी केली आहे.
काल रात्री मळगाव येथील एका युवकाचा अपघात झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यानं या मार्गावरून येणाऱ्या नागरिकांना त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी १०८ रुग्णवाहिका बोलवायची कुणी ? यावरून वैद्यकीय प्रशासन व रूग्णा सोबत उपस्थित असलेल्यांचा वाद झाला. हे प्रकरण हाणामारीवर पोहचलं. यातून काल रात्री सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक प्रशांत वाडकर यांना मारहाण झाली.
दरम्यान, या घटनेचा सिंधुदुर्गातील सुरक्षा रक्षकांनी जाहीर निषेध करत पोलिसांनी संबंधितावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करावा, असे न केल्यास सिंधुदुर्गतील सुरक्षा रक्षक सावंतवाडी पोलिस ठाण्यात ठीय्या आंदोलन करतील असा इशारा सुरक्षा रक्षकांमार्फत विजय गुरव, विद्याधर रेडकर,जगन्नाथ केळुस्कर,उमेश वाडकर,अनिल सावंत,संजय गावडे यांनी दिला आहे.