सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची निवडणूक | भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल रिंगणात !

पतसंस्था पुन्हा एकदा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प : राजन कोरगावकर
Edited by: देवयानी वरसकर
Published on: April 24, 2023 19:50 PM
views 360  views

सिंधुदुर्गनगरी : कॅशक्रेडिट मुक्त,15 टक्के उच्चाँकी  डिव्हिडड देणाऱ्या भाग्यलक्ष्मी सहकारी पॅनल पुन्हा एकदा 2023 ते 2028 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. पगाराच्या पटीत पन्नास लाखापर्यंत कर्ज देणारी पतसंस्था पुन्हा एकदा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प राजन कोरगावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

    यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेचे अनंत राणे, जिल्हा सरचिटणीस सुहास सावंत,महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, जिल्हा सरचिटणीस शिवाजी गावीत, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र जोईल, जिल्हा सरचिटणीस दिलीप मस्के, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ प्राथमिक शिक्षक संघटनेचे किशोर कदम, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ महाराष्ट्र चे दत्तराज फोंडेकर आदी उपस्थित होते.

    सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 14 मे रोजी जाहिर झाली असून या निवडणुकीत प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर केंद्रप्रमुख सभा, प्राथमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब महासंघ, प्राथमिक व उच्च प्राथमिक मुख्याध्यापक सेवा मंडळ या प्राथमिक शिक्षक संघटना एकत्र येऊन भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्यामाध्यमातून निवडणूक लढवणार आहेत.या पॅनेलचे पॅनेल प्रमुख म्हणून शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे. एकूण 15 जागांसाठी निवडणूक होणार असून भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे तालुका सर्वसाधारण क्षेत्र उमेदवार कुडाळ- विजय सावंत, कणकवली- श्रीकृष्ण कांबळी, मालवण-मंगेश कांबळी, वेंगुर्ला - सिताराम लांबर, दोडामार्ग- महेश काळे, सावंतवाडी- गोविंद शेर्लेकर, देवगड- संतोष राणे, वैभववाडी-  संतोष मोरे हे उमेदवार निश्चित करण्यात आले असून जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पुरूष- नारायण नाईक व संतोष राणे, जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र महिला -सौ ऋतुजा जंगले व सौ समिक्षा परब, जिल्हा इतरमागास प्रवर्ग-श्री महेंद्र पावसकर, जिल्हा अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग-श्री चंद्रसेन पाताडे,जिल्हा भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्ग-संजय पवार हे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

      भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा प्रचाराचा शुभारंभ श्री देव रवळनाध मंदिर ओरोस यैथे करण्यात आली.यावेळी सर्व उमेदवार उपस्थित होते. गेली 25 वर्षे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचे वर्चस्व प्राथमिक शिक्षक पतपेढीवर राहिलेले असून विद्यमान संचालक मंडळाने विविध सभासद हिताच्या योजना राबवून स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे संस्थैला सन 2022-23 या आर्थिक वर्षांत निव्वळ साडेसहा कोटीचा नफा झाला आहे.

     विरोधकांच्या कोणत्याही भूलथांपांना बळी न पडता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक सभासदांनी बहुमताने भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेल च्या सर्वच्या सर्व 15 उमेदवारांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहन राजन कोरगावकर यांनी केले.