सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचं रक्तदान शिबीर

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 21, 2025 16:28 PM
views 81  views

सिंधुदुर्ग : कुडाळ, सिंधुदुर्ग येथील सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे आयोजित रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यानी रक्तदान केले. 

या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुडाळ तालुक्याचे तहसीलदार विरसिंग वसावे साहेब यांनी फीत कापून केले. यावेळी जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कुडाळकर, कुडाळ चे माजी नगरसेवक एजाज नाईक, सावंतवाडी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदारांनी कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्य संबोधत, रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन कौतुक केले आणि रक्तदानाचे फायदे विषद केले.

आजच्या रक्तदान शिबीराला कुडाळ नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक अभी गावडे यांनी भेट देत रक्तदान केले. तसेच राष्ट्रीय कॉंग्रेस चे अभय शिरसाट, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, तन्मय वालावलकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका श्रेय गवंडे, राजू गवंडे, नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, उद्योजक मुश्ताक शेख,  जफर जमादार, हाफीज नाझीम, बांधकाम व्यावसायिक आणि रोटरीयन गजानन कांदळगावकर, शिवसेना शहर प्रमुख आणि कुडाळ नगरपंचायत चे विद्यमान नगरसेवक श्री. अभी गावडे, माजी नगरसेवक आबा धडाम, आदींनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या रक्तदान शिबीराचे आयोजन केल्या बद्दल सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे कौतुक केले. 

यावेळी बोलताना श्री. एजाज नाईक यांनी, संक्रमित आजारांमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हे रक्तदान शिबीर घेतल्याचे नमूद केले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्या स्वरूपाचे १२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच राखीव रक्तदात्यांची सुची बनवून आवश्यकतेनुसार राखीव रक्तदाते उपलब्ध केले जातील असे सांगितले. 

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे, रक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात येते. तसेच आजारी व्यक्तींना आवश्यकतेनुसार पेशंट बेड, वॉकर, व्हील चेअर, ऑक्सिजन सिलिंडर, इत्यादी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. तसेच जिल्ह्यातील अनाथाश्रमांमध्ये आवश्यकतेनुसार धान्यपुरवठा केला जात असल्याचे सांगितले.   

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत करत असलेले विविध उपक्रम आदर्शवत आहेत. धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते.

सर्व रक्तदात्यांचे आणि रक्तपेढी च्या कर्मचा-यांचे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्यावतीने संस्था एजाज नाईक यांनी आभार व्यक्त केले आणि दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्रथम रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या रक्तदान शिबिराच्या आयोजनात फाउंडेशनचे स्वयंसेवक हाफीज शेख, अय्याज दोस्ती, मुबीन दोस्ती, मेहबूब शेख, आदिल शाह, जमीर पटेल,  असगरअली शाह, जावेद मुजावर, इरबाज दोस्ती, जमीर पटेल, शादाब शेख, समीर गफ्फार खान, लुईस फर्नांडीस, अनीस दोस्ती, मकसूद खान, नियाझ शाह, फरहान मणीयार, अनिक नाईक, अब्दूल हवालदार, शाहरुख चौधरी, अमजद शेख, शहादत शेख, अर्षद दोस्ती, सादिक मेमन, नझीर करणेकर, तोहित करणेकर, साजिद दोस्ती, अस्लम साठी, इम्तियाझ करोल, यांनी विशेष मेहनत घेतली.