सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज डिनचा कार्यभार डॉ. अनंत डवंगे यांच्याकडे

Edited by:
Published on: January 30, 2025 17:19 PM
views 246  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार याच महाविद्यालयातील शल्यचिकित्सा शास्त्रचे प्रा. डॉ. अनंत डवंगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


या मेडिकल कॉलेजचा अधिष्ठाताचा अतिरिक्त कार्यभार शरीररचनाशास्त्रचे प्रा. डॉ. मनोज जोशी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, आता प्रशासकीय कारणास्तव त्यांच्याकडील हा कार्यभार काढून डॉ. डवंगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या सहीने हा शासन आदेश काढण्यात आला आहे.