"बाल स्नेही 2024 उत्कृष्ट बाल कल्याण समिती" पुरस्काराने सिंधुदुर्ग कोकण विभागाचा विशेष सन्मान

Edited by:
Published on: March 07, 2025 18:52 PM
views 112  views

सावंतवाडी : बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट  ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांच्या बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग ला "बाल स्नेही 2024 - उत्कृष्ट बाल कल्याण समिती " पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बाल कल्याणाच्या कार्यात सीडब्ल्यूसी च्या माध्यमातून केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ऍड. सुशीबेन शाह, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्या हस्ते व महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व राज्य मंत्री महिला व बाल विकास मंत्री मेघना बोडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा खास कार्यक्रम, यशवंतरावं चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट, मुंबई येथे संपन्न झाला. या खास कार्यक्रम तर्फे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुंबई यांनी आयोजित केला होता. मुलांच्या संरक्षण व काळजी संबंधित उत्कृष्ट कार्य करण्यासंबंधी हा पुरस्कार असल्याने "बाल स्नेही 2024 - उत्कृष्ट बाल कल्याण समिती" हा विशेष सत्कार मानाचा समजला जातो. या विशेष पुरस्काराबद्दल ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांनी पुरस्कार निवड समिती व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे आभार मानले आहेत. मुलांच्या संरक्षण व काळजी संबधी बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट च्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा घेतलेला वसा असाचा पुढे चालू ठेवण्याचे अभिवचन दिलेले आहे.