
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता एकूण ८ पंचायत समित्यांना आज अखेर ९ हजार ९६७ घरकुल मंजूरीचे उद्दिष्ट प्राप्त असून सर्वतोपरी प्रयत्न करुन त्यापैकी ९ हजार ९६७ लाभार्थ्यांना १०० टक्के ऐवढी मंजूरी देण्यात आलेली आहे. शासनाकडून प्रथम हप्ता वितरण मंजूरीचे लक्ष ५ हजार ५३९ असून त्यापैकी ७ हजार ९७ ऐवढी लाभार्थी प्रथम हप्ता वितरण मंजूरीसाठी पूर्तता केलेली असून हे प्रमाण १२८.१२ टक्के ऐवढी आहे. आज रोजी महाराष्ट्र राज्यातील एकूण ३४ जिल्ह्याचा विचार करता उद्दिष्ट मंजूरी व हप्ता वितरण लक्षांक पूर्ततेमध्ये सिधुदुर्ग जिल्हा सर्वप्रथम स्थानी आहे.
मंत्री ग्राम विकास व पंचायत राज, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्रानुसार केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र व १० लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाच्या कार्यक्रमास ग्रामपंचायत स्तरावरुन लाभार्थ्यांना दृकश्राव्य माध्यमातून व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पाहता यावी असे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील मंजूरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ४३३ ग्रामंपचायती ८ पंचायत समित्या व जिल्हास्तरावर सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण २ way प्रकारात पाहणे / आवश्यकतेनुसार मुख्यकार्यक्रमात संवाद साधणे यासाठी कुडाळ, वेंगुर्ले व कणकवली या तीन पंचायत समित्या, शिरोडा ता. वेंगुर्ला, परुळेबाजार ता. वेंगुर्ला, निरवडे ता.सावंतवाडी, कलमठ ता. कणकवली, कुणकेश्वर ता. देवगड, माणगांव ता. कुडाळ या ६ ग्रामपंचातींची निवड करण्यात आलेली आहे. उर्वरित सर्व पंचायत समित्या व उर्वरित सर्व ग्रामपंचायतीमध्ये गृहोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
सर्व ग्रामपंचायत ठिकाण सुमारे ७० ते १०० लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तसेच पंचायत समिती स्तरावर ३०० लाभार्थी व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत व जिल्हास्तरावर ५०० लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.