सिंधुदुर्ग जिल्ह्या‌ मुजोर अधिकाऱ्यांंच्या विळख्यात : सागर नाणोसकर

Edited by: विनायक गावस
Published on: August 04, 2023 14:53 PM
views 210  views

सावंतवाडी : दोडामार्ग बिजगर मार्गावरील दोन एसटी रस्ता सोडून बाहेर गेल्या आणि गंभीर अपघात झाला त्यातील बेळगाव गाडी तर भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेर गेली प्रवाशांनी चालक केबिन मधून बाहेर उड्या मारून आपला जीव वाचवीला. तर बिजघर गाडी मागच्या बाजूने गटारात गेली सदर अपघातात सात जण जखमी झाले. त्यातील काही जणांवर साटेली आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत तर काही जणांना गोवा बांबुली येथे अधिक उपचारकरिता नेण्यात आले मात्र एवढा मोठा गंभीर अपघात झालेला असतानाही सावंतवाडी आगारातील आगार व्यवस्थापक सारखे निर्णयाशम पद रिक्त असतानाही विभागीय कार्यालयाच्या एकाही अधिकाऱ्याने अपघात स्थळी भेट दिलेली नाही. एवढा मोठा अपघात होऊनही विभागीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याची    अपघात स्थळी अथवा जखमी व्यक्तींची भेट घेण्याची मानसिकता दिसून आली नाही. एस टी महामंडळाच्या नियमानुसार अशा गंभीर अथवा मारणान्तिक अपघात स्थळी विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांनी भेट देणे आवश्यक होते.     

मात्र एवढा मोठा अपघात घडलेला असतानाही या दोघंही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने त्यांची अपघाताप्रति तसेच जखमी प्रवाशांप्रति असलेली असंवेदनशीलता दिसून येत आहे तरी अशा असंवेदनशील अधिकाऱ्यांची वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी होऊन कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे तसेच अशा अधिकाऱ्यांमुळेच एस टी ची प्रतिमा लोकांत मलीन होत आहे. सद्या बऱ्याच एस टी गाडयांचे आयुष्यमान असेच किलोमीटर पूर्ण झालेल्या मोडक्या,टेल लाईट चालू नसलेल्या, पत्रे उचललेल्या गळक्या गाड्या प्रवासी वाहतूकीकारिता वाफरल्या जात आहे त्यामुळे सद्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. असे असताना RTO कार्यालयाकडून अशा गाड्या पासिंग होतातच कशा अशा गाडयांना फिटनेस सर्टिफिकेट rto कडून कसे काय दिले जाते असा प्रश्नही लोकांकडून विचारला जात आहे. तरी RTO अधिकाऱ्यांकडून अशा गाड्यांची वाटेत तपासणी करून कारवाई केली जावी जेणेकरून अशाप्रकारे प्रवाशांच्या जीवाशीखेळणे बंद होईल. आणि अपघात ही रोखता येतील. तसेच ज्या गाड्यांचा आता अपघात झाला आहे अशा गाड्यां प्रवाशी वाहतूकीकारिता योग्य होत्या का? याचीही तपासणी rto कडून करण्यात यावी.         

सद्या शालेय फेऱ्या वेळेत जात नसल्याने लोकप्रतिनिधी तसेच शाळांकडून गाड्या वेळेत सोडण्याबाबत वारंवार विभाग नियंत्रकांना निवेदने दिली जात आहेत. मात्र या अधिकाऱ्याकडून गाड्या वेळेत सोडण्याच्या फक्त आश्वासने दिली जातात मात्र कोणतीही कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे मुलांचे नाहक नुकसान होत आहे. लोकप्रतिनिधिच्या तक्रारी कडेही दुर्लक्ष केले जात आहेसद्याच्या विभाग नियंत्रकांचे आगारांच्या कामगिरीवर कोणतेही नियंत्रण नाही. शालेय फेऱ्या वेळेत सोडून मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोणतीही उपाय योजना यांच्याकडून अद्यापही केली जात नाही. शासनाकडून मुलांना सवलती देऊन शैक्षणिक पास दिले जातात मात्र गाड्या वेळेत नसल्याने त्यांना उशिरा शाळेत जावे लागते आणि शैक्षणिक नुकसान होते  यावरूनच या अधिकाऱ्यांची मुलांच्या शिक्षणाप्रति असलेली असंवेदशीलात दिसून येत आहे.आज सिंधुदुर्ग विभाग तोट्यात असल्याने वरिष्ठाकडून वारंवार विचारणा होत आहे मात्र अशा अनेक कारणानेच एस टी चा तोटा वाढत चालला आहे.याला कारणच हे असे असंवेदनशील आणि मुजोर अधिकारी आहेत तरी अशा अपघातात जखमी झालेल्या प्रवाशान प्रति तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसानिप्रति असंवेदनशील भूमिका असणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.