सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी, वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर बिनविरोध

तर व्हाईस चेअरमन पदी अंकीता आनंद बांदेकर बिनविरोध
Edited by: दिपेश परब
Published on: May 03, 2023 16:52 PM
views 165  views

वेंगुर्ला : 

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतपेढी , वेंगुर्ले च्या चेअरमन पदी बाबली वायंगणकर व व्हाईस चेअरमन पदी अंकीता आनंद बांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

   १९९४ मध्ये स्थापन झालेल्या भंडारी पतसंस्थेचे बाबली वायंगणकर हे १९ वे चेअरमन आहेत . १२ संचालक असलेल्या ह्या पतसंस्थेत ११ संचालक बिनविरोध निवडून आलेले असून एक जागा रिक्त आहे.

  चेअरमन पदी बाबली वायंगणकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपा च्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी पतसंस्थेत जाऊन त्यांचे व व्हा.चेअरमन अंकिता बांदेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी संचालक सारीका काळसेकर , प्रकाश गडेकर , जगंन्नाथ डोंगरे , गुरुनाथ कांबळी , व्यवस्थापक रेडकर उपस्थित होते .