
सावंतवाडी : कॅथोलिक धर्मप्रांताचे सिंधुदुर्ग बिशप अग्नेलो पिनहेरो यांनी सावंतवाडी येथील मिलाग्रीस चर्चला भेट देत पाहणी केली. येथील फादर व ख्रिस्ती धर्मियांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. नव्यानं बांधण्यात आलेल्या चर्चचे त्यांनी कौतुक केले.
येत्या ९ मे २०२६ ला या चर्चचे लोकार्पण होणार आहे. १६५२ साली हे चर्च सावंतवाडीत बांधण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून जुन्या चर्चच्या ठिकाणी नवीन चर्च उभारण्याचे काम सुरू होते. अखेर हे काम पूर्णत्वास आले आहे. येत्या मे महिन्यात नवीन चर्चचे लोकार्पण होणार आहे.
या पार्श्वभूमीवर नवे बिशप अग्नेलो पिनहेरो यांनी सावंतवाडीत भेट देत चर्चची पहाणी केली. यावेळी गोव्याचे बिशप सिमीयाव फर्नांडिस, फादर मिलेट डिसोझा, फा. फॅलिक्स लोबो, फा. रिचर्ड साल्डना, फा. ऑल्वीन गोन्सालवीस, फा. मिल्टन मोल्टेनो, फा. अमृत गोन्सालवीस आदींसह चर्चेचे सदस्य, कॅथोलिक बांधव उपस्थित होते.










