
बांदा : इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदानंद राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा उद्योजक सागर नारायण राणे व बांदा येथील युवा उद्योजकनीलू देसाई, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, व कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी हे कार्यालय सर्वसामान्य जनतेच आहे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहे. यावेळी कोलगाव जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी सांगितलं की सर्वसामान्य घराण्यातून आलेल्या एका युवा कार्यकर्त्याला आपण जिल्हा परिषद सदस्य केलं खरोखर ही एक आनंदाची बाब आहे. ही सर्वसामान्य ज्यांना राजकारणाची ओळख ही नाही अशा व्यक्तींना आपण आज जिल्हा परिषद सदस्य केलं भविष्यात ते आमदारही होऊ शकतात असे उद्गार त्यांनी काढले.
जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सांगितले की, हे जनसंपर्क कार्यालय फक्त इमारत नाही तर तुमच्या समस्या अपेक्षा आणि सूचना ऐकण्यासाठी उघडे असलेले दालन आहे. तुमच्या विश्वासाला उत्तर देण्यासाठी माझे दार नेहमी खुले आहे. इन्सुली जिल्हा परिषद मतदार संघातील ज्या सात गावांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यासाठी मला जनसंपर्क कार्यालयात नागरिकांसाठी विविध अर्ज, तक्रार नोंदणी केंद्र, शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन युवक महिलांच्या समस्या निवारण प्रशासनाशी संवाद अधिक जलद गतीने करण्यासाठी हे कार्यालय असल्याच त्यांनी सांगितलं.
यापुढे आपल्याला सरकारी कार्यालयात हेलपाटे मरावे लागणार नाही, याची पुरेपूर काळजी मी व आमचे पंचायत समिती सदस्य लोकप्रतिनिधी म्हणून घेणारच आहोत. आपल्या मतदारसंघातील जे विषय आहेत ते जिल्हा परिषद सभागृहामध्ये मांडण्यासाठी मी व माझे सहकारी पंचायत समितीमध्ये लोकांच्या समस्यांचं जलद गतीने कसं निवारण होईल याचा पुरेपूर प्रयत्न करणारच आहोत. आपले आशीर्वाद कायम राहोत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कास तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पंडित, निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन कास सरपंच प्रवीण पंडित यांनी केले. यावेळी विठ्ठल पंडित, संदीप गावडे, सुहास ठाकूर, राजू वाळके, सुधीन गावडे, नंदू नेमण, बाबल तुयेकर, विठ्ठल कळंगुटकर, निबाज खान, निलेश नाईक, रमेश मळगांवकर, श्याम पराष्टेकर, जयवंत परब, रूपाली राणे, गंधाली निगुडकर, विकी पंडित, पप्पू मुळीक, आबा धुरी, रामचंद्र नाईक, ऋषल पोपकर, सतीश मोरजकर, सुरेंद्र कोठावळे, तुकाराम मोरजकर, भाई म्हाडगुत, मयुर चराटकर, आदी ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्याही राजकीय व्यक्तींकडून न होता सर्वसामान्य युवा उद्योजकाकडून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं. यावेळी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.










