सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती ; सभापतीपदी तुळशीदास रावराणे

उपसभापती श्रद्धा सावंत
Edited by: संदीप देसाई
Published on: May 23, 2023 19:33 PM
views 109  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तुळशीदास रावराणे तर उपसभापती सौ.श्रद्धा दिलीप सावंत यांची मंगळवारी निवड करण्यात आली. या नुतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार मा. खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकच्या प्रधान कार्यालय सभागृह मध्ये करण्यात आला. 

    यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जि प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, महेश सारंग,प्रकाश बोडस, सौ.प्रज्ञा ढवण, समीर सावंत, बाबा परब, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी  उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप मांजरेकर, अशोक पराडकर, सदानंद सर्वेकर, प्रसाद पाटकर, मकरंद जोशी, सच्चिदानंद गोलतकर, सुजाता देसाई, अजय आकेरकर, सूर्यकांत बोडके, किरण रावले, दिलीप तवटे, आनंद ठाकूर, संतोष राऊळ, मंगेश ब्रम्हदंडे, प.स.माजी सभापती मनोज रावराणे, अशोक सावंत,आनंद शिरवलकर, संतोष कानडे, संजय आंग्रे, संदेश पटेल, अजय रावराणे, सुनिल लाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.               

सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्गची २०२३ ते २०२८या कालावधीसाठीची निवडणूक मागील महीन्यात पार पडली. या समितीचे सभापती , उपसभापती पदांची  निवड बाजार समितीच्या कार्यालयात  निवडणूक निर्णय अधिकारी अनिल रहीज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडीत सभापतीपदी तुळशीदास तुकाराम रावराणे तर उपसभापती श्रीम.श्रध्दा दिलीप सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी श्रीम.उर्मिला यादव, कृष्णा मयेकर, अजय हिर्लेकर उपस्थित होते. सभापती उपसभापती यांची निवड झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती व उपसभापती, समितीचे संचालक मंडळ यांनी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली. या सर्वांचे स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले. जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहामध्ये मा. खा. डॉ.निलेश राणे यांनी नूतन सभापती उपसभापती यांचे पुष्पगुच्छ व शाल फळ देऊन सत्कार केला तसेच नुतन संचालक मंडळाची ओळख करून घेतली. जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपस्थित नुतन संचालक मंडळास त्यांच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.