दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत स्कुल किट मोठा वाटा निभावेल : शुभांगी साठे

Edited by:
Published on: July 17, 2025 19:03 PM
views 146  views

सिंधुदुर्गनगरी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या सहयोगाने आज ओरोस येथे स्कुल किट वाटप करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट सुकर व्हावी, दिव्यांग असलेल्या पालकांच्या मुलांना मदतीचा हात मिळून त्यांची शाळा सुरु राहावी, ज्ञानार्जन घेऊन त्यांचे करिअर घडण्यास मदत व्हावी यासाठी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रथमेश सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले 

कोकण कला व शिक्षण विकास संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक शैक्षणिक वर्षात हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविला जातो. यावर्षी हि आतापर्यंत सिंधुदुर्ग, पुणे, बीड,अहिल्याबाई नगर, ठाणे, रायगड सह अनेक जिल्ह्यात शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न झाले असून याच वाटपाचा भाग म्हणून आज ओरोस येथे ५० शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवला जातो. अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे मुलांना पुस्तके, वह्या, पेन यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस कमी होतो हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट्स वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते.

या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, कोकण संस्थचे प्रथमेश सावंत, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, कोकण संस्थेच्या गौरी आडेलकर, वैष्णवी म्हाडगूत आणि अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनीहि उपस्थितांना मार्गदर्शन केले. समीर शिर्के यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर अनिल शिंगाडे यांनी आभार प्रदर्शन केले