सिंधू रत्न जॉब फेअर साठी मोठी गर्दी !

Edited by: भरत केसरकर
Published on: January 12, 2024 04:14 AM
views 776  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाच्या दिशेने हजारो तरुण तरुणींचे पाऊले वळू लागली असून विशाल परब आयोजित सिंधुरत्न जाॅब फेअरला सकाळ पासूनच नोकरीसाठी बेरोजगारांची गर्दी पाहायला मिळत आहे.सकाळपासून सिंधुदुर्ग,रत्नागिरी,कोल्हापूर जिल्ह्यासह गोवा राज्यातील युवक-युवती मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

       रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बेरोजगार युवक युवतींसाठी युवा नेते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब याने सिंधूरत्न जॉब च्या माध्यमातून नोकरीची संधी आज जिमखाना मैदानाच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे या जॉब फेअर मध्ये तब्बल 160 हून अधिक कंपन्या सहभागी झाले आहेत. शिवाय मोठ्या संख्येने या जॉब फेरला युवक युवतींनी नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे या जॉब फेअर च्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम देण्याचा विशाल परब यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या जॉब फेअर चे उद्घाटन झाले. मात्र सकाळपासूनच युवकांची पावले या जॉब वरच्या ठिकाणी म्हणजे जिमखाना मैदानावर वळू लागले आहेत. एकूणच या जॉब फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार असल्याचे यातून दिसून येत आहे.विशाल परब यांच्यासह भाजपची संपूर्ण टीम या जाॅब फेअर साठी जोरदार मेहनत घेत आहे.