
दोडामार्ग : पिकुळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई आणि श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळेच्या 50 व्या सुवर्णं महोत्सव कार्यक्रमानिमित्त रविवार दुसऱ्या दिवशी ही भरगच्च कार्यक्रम सकाळ पासून आयोजित केले होते. सर्वप्रथम सकाळी महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम गावातील सर्व महिलांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतर गावातील बचतगट महिलांचे गायन नृत्य, लहान मुलांचे डान्स असे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पिकुळे गावातील मोठ्या संखेने महिलांनी उपस्थिती दर्शविली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्मरणीका प्रकाशन होणार आहे. तसेच सुहास देसाई यांचा नागरी सत्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७. ३० वाजत प्रसिद्ध गायक यांची भावगीत भक्ती गिते सादर होणार आहेत. व रात्रौ ११. ०० वाजता चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी सर्व नाट्य रसिक व भजनी प्रेमी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.