'व्हॉइस ऑफ मीडिया'च्या सावंतवाडी तालुकाअध्यक्षपदी सिद्धेश सावंत

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2024 09:53 AM
views 268  views

सावंतवाडी : व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गची सर्व साधारण सभा कुडाळ एमआयडीसी येथील रेस्ट हाऊसला संपन्न झाली. या सभेत सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी युवा पत्रकार सिद्धेश सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली.  

व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तसेच कोकण विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, आनंद धोंड, महासचिव संजय पिळणकर, सहसचिव अमित पालव, खजिनदार शैलेश मयेकर, सहखजिनदार वासुदेव उर्फ नयनेश गावडे, उपाध्यक्षमिलिंद धुरी, भूषण सावंत, विष्णू धावडे, संघटक आनंद कांडरकर, सल्लागार डॉ. बी एन खरात, नागेश दुखंडे आदी जिल्हा पदाधिकारी तसेच प्रथमेश गवस उपस्थित होते.