युवकराजा सिद्धेश कलिंगणचा 'युवा कला गौरव'नं सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2023 15:28 PM
views 309  views

सिंधुदुर्ग : आर्ट बिट्स महाराष्ट्रच्या माध्यमातून सिंधुदुर्गचे युवा दशावतार सिद्धेश सुधीर कलिंगण यांचा 'युवा कला गौरव' पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. कला क्षेत्रात एक युवा कलाकार म्हणून करत असलेल्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट बिटस् फौंडेशन महाराष्ट्र कडून हा राज्यस्तरीय "युवा कला गौरव " पुरस्कार २०२२ प्रदान करण्यात आला. भविष्यात कला क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक जबाबदारीचं भान राखत, नव्या जोमाने उत्तम उत्तम कार्य करीत रहावं यासाठी हा पुरस्कार आपणास प्रेरणा देईल ही सदिच्छा आर्ट बिटस् फौंडेशननं व्यक्त केली आहे.