
देवगड : महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा व राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा निकाल १०० % लागला. राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत ७ विद्यार्थ्यानी व राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत २ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे.
राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षेत अर्चना राजू तांबे, ईश्वरी अनिल घाडी, ईश्वरी प्रसाद शिवगण, ओम गुरुप्रसाद अदम, मयांक प्रकाश कदम, कीर्ती रामचंद्र भिडे, कार्तिकी संतोष ढोके यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षेत लिशा उमेश आंबेरकर, समृद्धी सुनील गुरव यांनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना हिंदी विषयाच्या शिक्षिका संजीवनी जाधव व समीरा राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष ॲड.अजितराव गोगटे, सचिव -प्रवीण जोग , शाळा समिती अध्यक्ष-प्रसाद मोंडकर व मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.