श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक संपन्न

अध्यक्षपदी अमर प्रभू तर उपाध्यक्षपदी रश्मी महाबळ
Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2023 15:33 PM
views 221  views

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवार, दि. 28 एप्रिल रोजी पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. अध्यक्षपदी अमर गोपाळ प्रभू तर उपाध्यक्षपदी रश्मी हनुमंत महाबळ यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था राजन आरावंदेकर यांनी काम पाहिले.

 नवीन कार्यकारिणी अशी : अमर गोपाळ प्रभू (अध्यक्ष ), रश्मी हनुमंत महाबळ (उपाध्यक्ष), सदस्य - गजानन आनंदराव भोसले, ओंकार मुकुंद पेंडसे,  तुषार गणपत रुकारी, सत्यजित पांडुरंग साठे, राजन विनायक शेट्ये, मानसी महेश कुडतरकर, प्रीती जयप्रकाश डोंगरे, सुनील भैरू पाटील, दिनेश वसंत चराठकर.

नवीन संचालक मंडळाचा कालावधी 2028 पर्यंत राहणार आहे. यावेळी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे कार्यकारणी सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.