डिजिटल मिडीया संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांची 'कोकणसाद' ला सदिच्छा भेट

मुख्य संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सागर चव्हाण यांचे केलं अभिनंदन
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 02, 2026 20:32 PM
views 20  views

सावंतवाडी :  अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक, पत्रकार संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन गोव्यातील पणजी इथ होतेय. यानिमित्ताने गोवा इथं निघत असताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी 'कोकणसाद'च्या सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाला आवर्जून भेट दिली. दरम्यान, कोकणसाद लाईव्ह आणि दैनिक कोकणसादच्या मुख्य संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सागर चव्हाण यांचे खास श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन अभिनंदन केले. 

पणजी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या महाअधिवेशनासाठी जात असताना त्यांनी सावंतवाडी येथील कोकणसादच्या प्रधान कार्यालयाला भेट देऊन मुख्य संपादक सागर चव्हाण यांचे अभिनंदन केले. लोकमत समूहाचे माजी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले असून नवशक्ती, पुढारी, पुण्यनगरी अशा दैनिकांमध्येही त्यांनी संपादक म्हणून जवळपास 40 वर्ष काम केले आहे. नुकतीच त्यांनी राज्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांची संघटना स्थापन केली असून, या माध्यमातून त्यांनी डिजिटल मीडिया पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याच्या कार्याला प्राधान्य दिले आहे.

याच कार्याचा एक भाग म्हणून गोव्यात हे महाअधिवेशन होत आहे. कोकणवासीयांसाठी अत्यंत प्रभावी असे व्यासपीठ ठरलेल्या कोकणसादच्या माध्यमातून कोकणातील अधिकाधिक प्रश्न प्राधान्याने मांडावेत, अशा शुभेच्छा राजा माने यांनी सागर चव्हाण आणि सर्व टीमला दिल्या. यावेळी सिंधुदुर्ग अध्यक्ष भरत केसरकर, संघटनेचे सचिव तेजस राऊत यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.