डोंगरपाल इथं श्री स्वामी समर्थ मठात दरबार आयोजित !

Edited by: संदीप देसाई
Published on: May 15, 2024 14:40 PM
views 115  views

बांदा : प पू सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित डोंगरपाल येथील श्री स्वामी समर्थ मठात परमानंद महाराजांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक १६ रोजी दरबार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ ते रात्री १० वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे.

    यानिमित्ताने रात्री ९ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा संगीत सौभद्र हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा मठ डोंगरपाल यांच्यावतीने करण्यात आले आहे.