
कणकवली :श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती दि. १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ९.३० ते दु. ३.०० वा. या वेळेत कुडाळ येथे पंचायत समितीच्या बाजुच्या पटांगणावर वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र राज्य) व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जयंतीचे आयोजन करण्यात येत आहे.
श्री संत सेवालाल महाराज यांनी समाजासाठी आपले अवघे आयुष्य वाहून घेतले. त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व समाजबांधव यांनी उपस्थित रहावे असे आवाहन वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र राज्य) व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने
करण्यात येत आहे. सर्व अधिकारी कर्मचारी यांचे सन्मान करण्यात येणार असून तरी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. कार्यक्रमाचे प्रमुख उध्घाटक मा. श्री. अमोल फाटक, तहसीलदार, कुडाळ, मा. श्री. विजय चव्हाण, गट विकास अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड, जिल्हा मार्गदर्शक प्रेमचंद राठोड, कोकण विभागीय संघटक श्री. विलास चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश जाधव, उपाध्यक्ष, संजय राठोड,अविनाश राठोड, सचिव, गोविंदराव जाधव, सहसचिव ज्ञानेश्वर चव्हाण, कोषाध्यक्ष संजय पवार, सह कोषाध्यक्ष सतिश चव्हाण, प्रसिध्दी प्रमुख अरविंद जाधव, सहप्रसिध्दी प्रमुख श्री. अमरनाथ राठोड तसेच संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ, कुडाळ चे रमेश राठोड, शिवा चव्हाण, प्रकाश चव्हाण, काशिराम पवार, बाबू राठोड, प्रभू चव्हाण, संजय राठोड, कांतू चव्हाण, सिताराम राठोड, गुरु राठोड, मंगेश चव्हाण हे पदाधिकारी व सदस्य संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, गोविंद पवार, प्रकाश राठोड, राजेश राठोड, संजय राठोड, तानाजी चव्हाण हे करणार आहेत. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.