
कुडाळ : कुडाळमधील धुरीटेंब नगर येथे नूतन ‘श्री बाणेश्वर पेट्रोलियम’ या भारत पेट्रोलियमच्या पंपाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी या प्रसंगी उपस्थित राहून फित कापून पंपाचे अधिकृत उद्घाटन केले. "हा सोहळा आमच्यासाठी केवळ व्यावसायिक उद्घाटन नसून एक कौटुंबिक कार्यक्रम आहे," अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी नवउद्योजक अक्षय जडिये यांच्या धाडसाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांनी रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर न जाता येथेच नवनवीन उद्योग उभे करावेत. स्वतः उद्योग करून इतरांना नोकरी देण्याची जी संकल्पना अक्षयने राबवली आहे, ती कौतुकास्पद आहे. स्थानिकांनी स्थानिक स्तरावर उद्योग निर्माण केल्यास जिल्ह्याचा विकास वेगाने होईल."
हा प्रकल्प डॉ. बानवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय जडिये यांनी साकारला आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अक्षय जडिये आणि महेश धामापूरकर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या उद्घाटन सोहळ्याला राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने: मनीष दळवी (अध्यक्ष, जिल्हा बँक), सचिन पाटील (तहसीलदार, कुडाळ), सुकटे (आर.डी.सी.) दत्ता सामंत, डॉ. बानवलीकर जिल्हा परिषद सदस्य: दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, रुपेश कानडे. संजय पडते, सरपंच अजय आकेरकर, मंगेश प्रभू (पं. स. सदस्य), मिलिंद नाईक, अक्षय रेगे, बी. जी. गावडे. तसेच नगरसेवक निलेश परब, सचिन काळप, निलेश तेंडुलकर, सुनील बांदेकर, राजू गवंडे, विनायक राणे, पप्या तवटे, शशांक पिंगुळकर, मोहन सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.










