कुडाळ हायस्कूलमध्ये 'रामलल्ला'ला वंदन !

Edited by: ब्युरो
Published on: January 22, 2024 13:19 PM
views 252  views

कुडाळ : अयोध्येत सोमवारी ‘न भूतो न भविष्यती’ असा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरांच्या गर्भगृहात श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला अन् भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विधीवत विराजमान झाले. याचा उत्साह देशभर पाहायला मिळाला. याच पार्श्वभूमीवर कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ इथं श्री रामाचं पूजन करण्यात आलं. 

रामलल्ला प्रतिष्ठापना दिन कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेज कुडाळ येथे साजरा करण्यात आला. क. म. शि. प्र. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिरसाट सर, संस्था पदाधिकारी  गुरुवर्य का.आ, सामंत सर ,सहकार्यवाह सुरेश चव्हाण सर, सरकार्यवाह वैद्य सर यांनी प्रतिमा पूजन करून श्री प्रभू रामाला वंदन करण्यात केले.

यावेळी उच्च माध्यमिक उपप्राचार्य श्री. हावळ, क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर, रामचंद्र खाकर, ज्योती ठाकूर, रूपाली देसाई व उत्तम पाटकर आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.